Biyane Tokan Yantra


'Biyane Tokan Yantra' : नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी वेबसाईटवर बियाणे टोकन यंत्रासाठी 50 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. ज्या शेतकरी बांधवाना हे अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी त्यांचे अर्ज शेवटच्या तारखेच्या आत सादर करून द्यावेत.

 

आजच्या लेखात आपण बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तसेच त्याची सद्यस्थिती कशी तपासायची याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत.




 

'Biyane Tokan Yantra'

खरीप असो कि रब्बी पेरणी करतांना मजूर जमा करताना शेतकरी बांधवांची दमछाक होत असते. अशावेळी तुमच्याकडे जर बियाणे टोकन यंत्र असेल तर अगदी सहजतेने आणि कमी वेळात जास्त काम केले जाते

हे बियाणे टोकन यंत्र बाजारातून खरेदी करायचे असेल तर त्यासाठी खर्च येते पण आता शासन यासाठी 50 टक्के अनुदान देत असून यासाठी शेतकऱ्याला महाडीबीटी या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो.

पेरणीसाठी टोकन यंत्र वापरणे म्हणजे मजुरांच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते. त्यामुळे या लाभापासून कोणतेही शेतकरी वंचित राहू नये म्हणूनच हा लेख अशा शेतकऱ्यांसाठी आहे.

बियाणे टोकन यंत्रनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1) 7 /12, 8-

2) आधार कार्ड

3) बँक पासबुकाच्या झेरॉक्स

4) अनु. जाती, अनु. जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र

5) अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावा लागेल.


अशाच नवीन अपडेट्स साठी आमच्या YouTube चानेल ला Subscribe करा 

👇👇👇👇👇👇👇👇



टोकन यंत्राचे फायदे

1) अत्यल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन टोकन यंत्र खूपच उपयोगाचे आहे.

2) कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन टोकन यंत्राचा चांगलाच फायदा होतो.

3) बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी करते वेळेस सोयाबीन टोकण यंत्र महत्त्वाची भूमिका बजावतो.

बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज

सर्वप्रथम गुगलमध्ये mahadbt farmer login असे सर्च करायचे आहे.

Applicant login here अशी लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करा.

तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा किंवा तुमच्या आधार नंबरचा उपयोग करून देखील तुम्ही लॉगीन करू शकता.

आधार नंबरला जो मोबाईल लिंक करण्यात आला आहे त्यावर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि otp तपासा या बटनावर क्लिक करा.

अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा.

कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.

या ठिकणी आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे कि मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.

तपशील या चौकटीवर क्लिक करून मनुष्यचलीत औजारे हा पर्याय निवडा.

यंत्रसामग्री औजारे या पर्यायावर क्लिक करून टोकन यंत्र हा पर्याय निवडा.

योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा.

जतन करा या बटनावर क्लिक करा.

अर्जाची सद्यस्थिती पहा

'Biyane Tokan Yantra' महा डीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हफ्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार पुढील कागदपत्रे अपलोड करून द्या.

तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.

छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल. अर्जाची पोहोच पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी अर्ज सादर करू शकता.